How to reduce diabetes: आजच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेह (डायबिटीज) हा एक गंभीर आजार बनला आहे. रक्तातील साखरेचे (blood sugar) प्रमाण नियंत्रणात ठेवणे हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी मोठे आव्हान असते. योग्य वैद्यकीय उपचारांसोबतच काही नैसर्गिक उपाय आणि चांगल्या सवयी वापरून मधुमेह कमी करण्यासाठी मदत होते.
हे नैसर्गिक उपाय (How to reduce diabetes) तुमच्या रक्तातील साखर कमी करून तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
1. मेथी दाणे: मेथी दाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात विरघळणारे फायबर (fiber) असते, जे पचन क्रिया हळू करते आणि ग्लुकोजचे शोषण कमी करते. रोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मेथी दाणे खाल्ल्याने साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
2. जांभूळ: आयुर्वेदानुसार, जांभळाच्या बिया मधुमेहावर अत्यंत गुणकारी आहेत. जांभळाच्या बियांची पावडर (powder) तयार करून रोज सकाळी गरम पाण्यासोबत घेतल्यास साखर कमी होण्यास मदत होते.
3. कारले: कारल्यामध्ये इन्सुलिनसारखे गुणधर्म असतात, जे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करतात. आठवड्यातून काही वेळा कारल्याचा रस घेतल्यास फायदा होतो.
4. आवळा: व्हिटॅमिन सी (Vitamin C) आणि अँटिऑक्सिडंट्सने (antioxidants) समृद्ध असलेला आवळा स्वादुपिंडाला (pancreas) योग्य प्रकारे काम करण्यास मदत करतो.
हे देखील वाचा – Home Remedies for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी सोपे घरगुती उपाय
आहार आणि व्यायाम (How to reduce diabete)
मधुमेह कमी करण्यासाठी आहार खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या आहारात संपूर्ण धान्ये, कडधान्ये, हिरव्या भाज्या आणि कमी गोड फळांचा समावेश करा. नियमितपणे चालणे, योगा किंवा कोणताही व्यायाम केल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
लक्षात ठेवा: हे नैसर्गिक उपाय डॉक्टरांच्या औषधांना पर्याय नाहीत. कोणताही उपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
हे देखील वाचा –