उद्यापासून सुरू होणार Ind vs Aus वनडे सीरिज; विराट -रोहितचे होणार मैदानावर पुनरागमन

Ind vs Aus ODI Series 2025
Ind vs Aus ODI Series 2025

Ind vs Aus ODI Series 2025: भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (India Tour of Australia) 19 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे (ODI) मालिकेने होत आहे. युवा कर्णधार शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वाखालील टीम इंडिया (Team India) क्रिकेटच्या या दिग्गज प्रतिस्पर्ध्याला त्यांच्याच भूमीवर आव्हान देण्यासाठी सज्ज झाली आहे.

या मालिकेतून वरिष्ठ खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन करत असल्याने चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Ind vs Aus ODI Series 2025: मालिकेचे वेळापत्रक :

सामना (Match)तारीख (Date)ठिकाण (Venue)वेळ (IST)
1st ODIरविवार, 19 ऑक्टोबरपर्थ स्टेडियम, पर्थ (Perth)सकाळी 9:00 AM
2nd ODIगुरुवार, 23 ऑक्टोबरॲडलेड ओव्हल, ॲडलेड (Adelaide)सकाळी 9:00 AM
3rd ODIशनिवार, 25 ऑक्टोबरसिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी (Sydney)सकाळी 9:00 AM

सर्व सामने भारतीय वेळेनुसार (IST) सकाळी 9:00 वाजता सुरू होतील.

Ind vs Aus ODI Series 2025: दोन्ही संघांचे स्क्वॉड (Team Squads):

टीम इंडिया (India ODI Squad):

शुभमन गिल (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, के एल राहुल (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, यशस्वी जैस्वाल.

(वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे, तर अष्टपैलू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे बाहेर आहे.)

ऑस्ट्रेलिया (Australia ODI Squad):

मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, कूपर कॉनोली, बेन द्वारशुईस, नॅथन एलिस, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू कुहनेमन, मार्नस लाबुशेन, मिचेल ओवेन, जोश फिलीप (यष्टिरक्षक), मॅथ्यू रेनशॉ, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल स्टार्क.

हे देखील वाचा –How to reduce diabetes: मधुमेह कमी करण्यासाठी 4 सोपे आणि नैसर्गिक उपाय