संजय गांधी निराधार योजना काय आहे? दरमहिन्याला कोणाला मिळणार 2500 रुपये? वाचा

Sanjay Gandhi Niradhar Yojana in Marathi

Sanjay Gandhi Niradhar Yojana in Marathi: राज्यातील निराधार, दिव्यांग, विधवा आणि अनाथ मुलांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना (Sanjay Gandhi Niradhar Yojana) आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता त्यांना दरमहा 1,500 ऐवजी 2,500 रुपये दिले जातील.

या योजनेची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आली. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 4,50,700 संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी आणि 24,003 श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थींना थेट फायदा होणार आहे.

वाढीव अनुदान ऑक्टोबर 2025 पासून लागू होईल आणि यासाठी 570 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

संजय गांधी निराधार योजना काय आहे? (Sanjay Gandhi Niradhar Yojana in Marathi)

संजय गांधी निराधार अनुदान योजना ही राज्यातील निराधार पुरुष, महिला, अनाथ मुले, दिव्यांग व्यक्ती, निराधार विधवा, घटस्फोटित महिला, तृतीयपंथी आणि इतर गरजू नागरिकांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश त्यांना सामाजिक आणि आर्थिक आधार देणे हा आहे.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे (Sanjay Gandhi Niradhar Yojana Documents)

  • आधार कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • निवासाचा दाखला
  • रेशन कार्ड
  • वयाचा दाखला
  • अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पतीच्या मृत्यूचा दाखला (विधवा महिलांसाठी)
  • बँक पासबुकची प्रत

अर्ज प्रक्रिया

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, लाभार्थ्याने आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयात किंवा संजय गांधी निराधार योजनेच्या संबंधित विभागाकडे अर्ज करावा. अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडावी लागतात.


हे देखील वाचा

2025 मध्ये कोणत्या नोकऱ्यांना मिळतो सर्वाधिक पगार? टॉप 10 करिअर पर्याय

 व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा बॅकअप कसा घ्यावा? जाणून घ्या माहिती

Aadhaar Card Update Process: आधार कार्ड अपडेट करण्याची सोपी पद्धत जाणून घ्या